CHRISTMAS WITH CHESSPA

Gift the little ones the joy of ChessPa

Checkout Now!

chesspa christmas banner

जी.एच.रायसोनी मेमोरियल नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा २०२५

by Vivek Sohani - 24/05/2025

जी एच रायसोनी मेमोरियल नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिडचेस असोसिएशन, नांदेड, जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन, नागपूर व सक्षम चेस अकॅडमी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या सहकार्याने गणराज बंकेट अँड कॉन्फरन्स हॉल नांदेड येथे संपन्न झाली. जी एच रायसोनी मेमोरियल नांदेड जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन नांदेड जिल्हा चेस अँड रॅपिडचेस असोसिएशन, नांदेड, जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन, नागपूर व सक्षम चेस अकॅडमी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या सहकार्याने गणराज बंकेट अँड कॉन्फरन्स हॉल नांदेड येथे संपन्न झाली.



स्पर्धेचे उद्घाटन:

बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. साहेबराव मोरे, अध्यक्ष नांदेड जिल्हा बुद्धीबळ संघटना, तर प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटक म्हणून प्राचार्या अनुराधा मिस, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेड; सुनील देशमुख (बारडकर), कोषाध्यक्ष बुद्धीबळ संघटना; फादर मुथुस्वामी, आदित्य तुंगेनवार, राजू सुरा, डॉ. दिनकर हंबर्डे (सचिव), सुचिता हंबर्डे, संचालिका सक्षम चेस अकॅडमी, नांदेड; सचिन शिंदे, प्राचार्य अविनाश कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

नांदेड जिल्ह्यातील एकूण १९२ खेळाडूंनी सहभाग नोंदविलेला असून आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त १९ खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते. बुद्धीबळ स्पर्धा खुल्या व ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली गटामध्ये उत्साहात संपन्न झाली. सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ मा. डी. पी. सावंत साहेब - माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व डॉ. साहेबराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेत एकूण रोख रक्कम रुपये ३०,०००/- तसेच २७ ट्रॉफी, मेडल व सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच नागपूरचे जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन चे श्री भूषण श्रीवास यांनी रोख रक्कम स्पॉन्सर करून स्पर्धेस सहकार्य केले होते.

मा. डी.पी. सावंत साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वागत करते वेळी डॉ.साहेबराव मोरे (बुद्धिबळ संघटना अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न झाले .

माजी प्राचार्य मुथुस्वामी ज्ञानमाता विद्या विहार यांचे स्वागत करते वेळीप्रा. डॉ. दिनकर हंबर्डे (बुद्धिबळ संघटना सचिव)

सुनील देशमुख बारडकर (कोषाध्यक्ष बुद्धिबळ संघटना) यांचे स्वागत करते वेळी आशिष लोखंडे (डायरेक्टर किडझी स्कूल, नांदेड)

मा. राजू सुरा, सुनील देशमुख बारडकर, आदित्य तुंगेवार डी व्ही एम स्कूल उपाध्यक्ष,डॉ.साहेबराव मोरे प्राचार्य अनुराधा मिस  आदी

बक्षीस विजेते खेळाडू

स्पर्धेचा अंतिम निकाल

खुला गट – १ ते १० क्रमांकाची विजयी खेळाडू अनुक्रमे:
निळकंठ श्रावण, आदर्श पाटील (देगलूर), चिंचोलकर आदित्य, आशिष लोखंडे, गीते श्रीनिवास, प्रथमेश सुतार, हटकर सिद्धार्थ, पाटील अधिराज, अभय अन्नपूर्णे, संजय तिवसकर (माहूर)

वयोगटानुसार विजेते (१ ते ५ क्रमांक)

९ वर्षे अंतर्गत:

  • मुले: रुद्रांश होट्टे, रियांश घंटे, उत्कर्ष पांचाळ, आरुष विडेकर, शौर्य मुप्पानेनी

  • मुली: अंशिका अवरदे, अनुश्री लोखंडे, द्रिती धोंडे, देशमुख धनिष्का

११ वर्षे अंतर्गत:

  • मुले: वरद पैंजणे, देवांश चव्हाण, अर्णव तोष्णीवाल, आयुष सूर्यवंशी, अद्वैत घन

  • मुली: रितिका बनकर, रेवा तौर, संनिधी पाटील, नक्षत्र पल्लेवाड, गार्गी संगी

१३ वर्षे अंतर्गत:

  • मुले: आदित्य गायकवाड, सर्वज्ञ टाकळकर, सत्यजित गायकवाड, ऋषिकेश शिवकुमार, स्वहम वाघमारे

  • मुली: ओवी पवार, हर्षिता खटिंग, ऋतुजा कदम, श्राव्या धोंडे, भार्गवी माने

१५ वर्षे अंतर्गत:

  • मुले: चेतन चौडम, मंथन भुसा, रणधीर बनकर, शार्दुल देऊळगावकर, स्वयम सूर्यवंशी

  • मुली: अवनी कापसे, शताक्षी गादेवार, माहेश्वरी पेटेकर, भूतणर श्रावणी, निवेदिता कोंडलवाडे

१७ वर्षे अंतर्गत:

  • मुले: कटके प्रद्युम्न, स्वराज माळी, जाधव मयूर, देवेश डांगे, समयक पवार

  • मुली: शिवानी मोरे, आरुषी मोरे

१९ वर्षे अंतर्गत:

  • ऋषिकेश गव्हाणे, निशांत बोकारे, सुमित वायवाल




Contact Us