chessbase india logo

फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - वैशालीचा पहिला विजय; झु जायनरची बरोबरीत सुटका

by Vivek Sohani - 19/04/2025

आयएम नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गारिया) हिने जीएम जिनेर झू (चीन) विरुद्धच्या डावात आपल्या वजिराचा बळी देत फक्त हत्ती आणि घोड्यासाठी ती चाल खेळली. या खेळात तिला विजय मिळवण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण ती त्या संधींचा पुरेपूर फायदा घेऊ शकली नाही आणि फिडे पुणे ग्रँड प्रिक्सच्या पाचव्या फेरीतील हा सामना बरोबरीत सुटला आणि झू जायनर हिने आपली आघाडी कायम ठेवली. जीएम आर वैशाली हिने आयएम बाथकुईग मुङ्गुंतुुल (मंगोलिया) विरुद्ध आपला स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. भारताच्या दोन सर्वोच्च महिला बुद्धिबळपटू, जीएम कोनेरू हम्पी आणि जीएम हरिका द्रोणावल्ली यांनी केवळ १९ चालींत सामना बरोबरीत सोडला. आयएम दिव्या देशमुख हिने अत्यंत चुरशीच्या लढाईत आयएम पोलिना शुवालोव्हा विरुद्ध सामना बरोबरीत सोडवला. आज स्पर्धेचा विश्रांतीचा दिवस आहे. सहावी फेरी उद्या, रविवार २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होईल.

वैशालीचा स्पर्धेतील पहिला विजय - हम्पी हरिका यांची लवकर बरोबरी

जीएम जिनेर झू (चीन) हिने आयएम नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गारिया) विरुद्ध कठीण प्रसंगातून सावरत सामना बरोबरीत राखला आणि ५ पैकी ४ गुणांसह एकहाती आघाडी कायम ठेवली आहे. जीएम कोनेरू हम्पी आणि आयएम दिव्या देशमुख प्रत्येकी ३.५/५ गुणांसह अव्वल स्थानापासून केवळ अर्ध्या गुणाने मागे आहेत. जीएम हरिका द्रोणावल्ली, आयएम पोलिना शुवालोव्हा आणि जीएम आर वैशाली प्रत्येकी २.५/५ गुणांसह पुढे आहेत.

आयएम नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गारिया) हिने आतापर्यंत स्पर्धेत अपराजेय ठरलेल्या जीएम झू जायनर (चीन) हिच्या उल्लेखनीय कामगिरीत पहिल्यांदा धक्का देत लक्षवेधी खेळ केला.

वैशाली - बटखुयाग : 1-0

जीएम आर वैशाली (२४८४) हिने आयएम बटखुयाग मंगुंतुल (मंगोलिया, २३६१) हिच्याशी क्‍लासिकल रेटेड प्रकारात तीन वेळा सामना खेळला आहे. पहिल्या दोन लढतींमध्ये वैशालीने विजय मिळवला, तर तिसरा सामना बरोबरीत सुटला.

Position after 40...Ne5?

आधीच कठीण स्थितीत असताना, काळ्याने चुकीची 40...Ne5? ही चाल खेळली, ज्यामुळे जबरदस्तीने रुकची अदलाबदली झाली 41.Rc7+ Rd7 42.Rxd7+ Bxd7 43.Bxa6, आणि त्यानंतर पांढऱ्याने केवळ नऊ चालींत सामना जिंकला.

आर. वैशाली हिची फिडेने प्रसारित केलेली मुलाखत

जीएम आर वैशाली (२४८४) हिने आयएम बटखुयाग मंगुंतुल (मंगोलिया, २३६१ सोबत आपला डाव जिंकत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला

कोनेरू हम्पी व हरिका द्रोणावल्ली यांच्यातील डाव फक्त १९ चालीत बरोबरीत सुटला

आयएम दिव्या देशमुख यांनी आयएम पोलिना शुवालोव्हा यांच्याविरुद्ध चुरशीचा सामना करत बरोबरी साधली.

नुर्ग्युल - झु जायनर ०.५-०.५

बल्गेरियाच्या नुर्ग्युल सालीमोव्हा हिने याआधी झु जायनर हिच्यासोबत एकच क्लासिकल प्रकारात डाव खेळला होता ज्यात झु जायनर हिने बाजी मारली होती. स्पर्धेतील पाचव्या फेरीत तिने वजिराचा बळी देत डावात चांगली पोझिशन आणली होती पण तिचे रुपांतर विजयात करणे तिला शक्य झाले नाही. तथापि झु जायनर हिने सुंदर बचावात्मक चाली रचत डाव बरोबरीत सोडवला आणि आपली स्पर्धेतील एकाल आघाडी कायम ठेवली.

Position after 44...Nd5??

नुर्ग्युलला असं वाटलं की 45.Qxd5! नंतर पांढऱ्याने सामना जिंकायलाच हवा. 45...exd5 46.Rxc7+ Kh8 47.Bc8 ही चाल पांढऱ्याला प्रथम दर्शनी खूप प्रभावी वाटत होती. Qa3 48.R1c6 Qxe3+ 49.Kh2 – इथे काळ्याने अचूक बचाव शोधला: Qe8यानंतर 50.Be6 Rd8 51.Kg1 Qf8 52.Rf7 Qb4 53.Bxf5, पण पांढऱ्याने नंतर काही चांगल्या संधी गमावल्या आणि अखेर सामना बरोबरीत संपला.

आयएम नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गारिया) यांच्याशी मुलाखत | व्हिडिओ: फिडे

आयएम नुर्ग्युल सलीमोव्हा हिने जीएम जिनेर झू ला हरवण्याच्या काही मोठ्या संधी गमावल्या.

आयएम दिव्या देशमुख आपल्या सहकाऱ्यांना, जीएम कोनेरू हम्पी आणि जीएम हरिका द्रोणावल्ली यांना पाहत आहे.
आयएम राकेश कुलकर्णी आणि सीएम साहिल टिकू यांच्याकडून लाइव्ह कमेंट्री | व्हिडिओ: फिडे

बक्षिसे :

एकूण बक्षीस निधी €80,000 इतका आहे. त्यापैकी पहिले तीन क्रमांकाचे बक्षिसे अनुक्रमे €18,000, €13,000 आणि €10,500 आहेत. तसेच टॉप तीन ग्रँड प्रिक्स पॉइंट्स पुढीलप्रमाणे आहेत: पहिला क्रमांक: 130 गुण, दुसरा क्रमांक: 105 गुण, तिसरा क्रमांक: 85 गुण

स्पर्धेचे वेळापत्रक

ही स्पर्धा 14 एप्रिल 2025 पासून 23 एप्रिल 2025 पर्यंत होणार आहे. आज, 19 एप्रिल हा एकमेव विश्रांतीचा दिवस असेल.


Contact Us