फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - दिव्या देशमुखचे दमदार पुनरागमन, हम्पीचा सलग दुसरा विजय
IM दिव्या देशमुख हिने FIDE पुणे ग्रँड प्रिक्सच्या चौथ्या फेरीत IM मेलिया सॅलोमी (जॉर्जिया) हिच्यावर मात करत विजयी पुनरागमन केले. ही लढत मेजर पीस एंडगेममध्ये गेली, जिथे दिव्याला तिच्या प्रतिस्पर्धीच्या चुकांची वाट पाहावी लागली. GM कोनेरू हम्पी हिने सलग दुसऱ्या फेरीत विजय मिळवत IM पोलिना शुवालोवा हिचा पराभव केला. हम्पी आणि दिव्या दोघींचेही आता ४ पैकी ३ गुण झाले आहेत. त्या दोघी GM झू जायनर (चीन) हिच्या मागे अर्ध्या गुणाने आहेत. झू जायनरने IM अलीना काशलिंस्काया (पोलेण्ड) हिला पराभूत करत आघाडी कायम ठेवली आहे. GM हरिका द्रोणावल्ली आणि GM आर वैशाली यांच्यातील सामन्यात बरोबरी झाली. IM नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गेरिया) हिने या स्पर्धेतील आपला पहिला विजय IM बाथखुयाग मंगुंतुल (मंगोलिया) हिच्यावर नोंदवला. पाचवी फेरी आज दुपारी ३ वाजता (IST) सुरू होणार आहे. फोटो : अनमोल भार्गव
झु जायनरची ३.५/४ गुणांसह आघाडी कायम
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या स्पर्धेत दुसऱ्यांदा ४/५ डाव निकाली लागले.
मेलिया - दिव्या ०-१
IM दिव्या देशमुख (रेटिंग 2460) हिने IM मेलिया सॅलोमी (जॉर्जिया, रेटिंग 2293) हिच्याविरुद्ध पहिल्यांदाच खेळले. हा सामना क्वीन आणि दोन रुक्सच्या एंडगेमपर्यंत गेला, जिथे दिव्याने सातत्याने दबाव ठेवत खेळ सुरु ठेवला आणि परिणामी अखेरीस तिच्या प्रतिस्पर्धीने चूक करत सामना गमावला.
पोलिना - हम्पी ०-१
GM कोनेरू हम्पी (रेटिंग 2528) हिने यापूर्वी IM पोलिना शुवालोवा (रेटिंग 2500) हिच्याविरुद्ध दोन क्लासिकल रेटेड सामने खेळले असून, दोन्ही बरोबरीत संपले होते. मात्र, यावेळी हम्पीने डबल रुक एंडगेममध्ये क्विनसाइडवर दोन जोडलेले पासर तयार केले आणि त्याचा योग्य फायदा घेत विजय मिळवला.
फिडेकडून प्रसारण होत असलेली लाईव्ह कोमेंट्री परत बघण्यासाठी :
बक्षिसे :
एकूण बक्षीस निधी €80,000 इतका आहे. त्यापैकी पहिले तीन क्रमांकाचे बक्षिसे अनुक्रमे €18,000, €13,000 आणि €10,500 आहेत. तसेच टॉप तीन ग्रँड प्रिक्स पॉइंट्स पुढीलप्रमाणे आहेत: पहिला क्रमांक: 130 गुण, दुसरा क्रमांक: 105 गुण, तिसरा क्रमांक: 85 गुण
स्पर्धेचे वेळापत्रक
ही स्पर्धा 14 एप्रिल 2025 पासून 23 एप्रिल 2025 पर्यंत होणार आहे. शनिवार, 19 एप्रिल हा एकमेव विश्रांतीचा दिवस असेल.