chessbase india logo

फिडे महिला ग्रँड प्रिक्स - पाचव्या चरणाच्या दुसऱ्या फेरीत दिव्याची विजयी घोडदौड कायम

by Vivek Sohani - 16/04/2025

फिडे महिला ग्रँड प्रिक्स - पाचव्या चरणाच्या दुसऱ्या फेरीत वैशाली एक उत्कृष्ट खेळाडू असूनसुद्धा, आपला उंट एका चुकीच्या चालीने फार लवकर गमावला आणि दिव्याने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दुसरीकडे, झू जिनरने आपल्या उत्कृष्ट रुक एंडगेमच्या जोरावर एक महत्त्वाचा विजय मिळवला. या साऱ्या घडामोडींनंतर आता दुसऱ्या फेरी अखेर दिव्या आणि झू जायनर संयुक्त आघाडीवर आहेत तर पोलिना शुवालोवा हिने आजचा तिचा डाव बरोबरीत सोडवत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली यांनी अनुक्रमे जॉर्जियाच्या आयएम मेलिया सॅलोमे आणि पोलंडच्या आयएम अलीना काशलिंस्काया यांच्याशी बरोबरी साधली. तिसरी फेरी आज दुपारी ३ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होणार आहे. फोटो : फिडे / विवेक सोहनी

दिव्या देशमुख - वैशाली आर १-०

आयएम दिव्या देशमुख (२४६०) हिने या सामन्यापूर्वी जीएम आर. वैशाली (२४८४) यांच्याविरुद्ध तीन क्लासिकल रेटेड सामने खेळले होते. त्यापैकी पहिला सामना दिव्याने जिंकला होता, तर पुढचे दोन सामने बरोबरीत सोडवले होते. या सामन्यात, वैशालीने १७व्या चालीत गंभीर चूक केली.

17...Bg4 नंतरची डावातील स्थिती

१७...Bg4?? या चालीमुळे दिव्याला अचानक संधी निर्माण झाली. तिने ती संधी ओळखत एक अप्रतिम टॅक्टिकल चाल शोधली — १८.Nxf6! आणि दिव्याचा विजय निश्चित झाला. यानंतरचा डाव असा होता: 18...Bxf3 19.Nxd7+ Ke8 20.Nc5 Bc6 21.Re6 Bd7 22.Re5 h6 23.Bd2 Rf8 24.Rae1 Rf7 25.Bb4 Rb8 26.Ba3, आणि यानंतर वैशालीला मात्र कोणताही मटेरीअलचा तोटा टाळणे अशक्य झाले आणि सामना संपुष्टात आला. या ठिकाणी १७...Re8 ही चाल खेळली असती, तर तरीसुद्धा वैशालीला आपला लढा टिकवता आला असता. दिव्याची १८.Nxf6! ही चाल इतकी सुंदर आणि प्रभावी होती की ती भविष्यातल्या कोणत्याही टॅक्टिक्स वर आधारित पुस्तकात निश्चितपणे स्थान मिळवेल ह्यात तिळमात्र शंका नाही!

आयएम दिव्या देशमुख - जीएम आर. वैशाली, विश्लेषण: आयएम सागर शाह | व्हिडिओ: चेसबेस इंडिया
दिव्या देशमुख हिची दुसऱ्या फेरीनंतरची मुलाखत | व्हिडिओ - फिडे

दिव्या देशमुख हिने स्पर्धेत उत्तम सुरुवात केली असून सध्या ती २ गुणांसह झू जायनर सोबत संयुक्त आघाडीवर आहे. | फोटो : अनमोल भार्गव

आयएम मेलिया सॅलोमे (जॉर्जिया) - जीएम कोनेरू हम्पी (भारत) : ०.५ - ०.५ | फोटो : अनमोल भार्गव

आयएम पोलीना शुवालोव्हा (फिडे)- आयएम नुर्ग्युल सलीमोव्हा (बल्गेरिया) : ०.५ - ०.५ | फोटो : अनमोल भार्गव

जीएम हरिका द्रोणावल्ली (भारत) - आयएम अलीना काशलिंस्काया (पोलंड): ०.५ - ०.५ | फोटो : अनमोल भार्गव
Interview with GM Jiner Zhu | Video: FIDE

IM Batkhuyag Munguntuul (MGL) - GM Jiner Zhu (CHN): 0-1 | फोटो : अनमोल भार्गव

दुसऱ्या फेरीतील अधिक फोटोसाठी येथे क्लीक करा.

दुसऱ्या फेरीची स्ट्रीम बघण्यासाठी वरील व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकता | व्हिडिओ - फिडे

Contact Us